राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे


राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सव्वा लाखांहून अधिक
९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.  
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे. 

राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे-८, ठाणे मनपा-२०, नवी मुंबई मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-३, भिवंडी-निजापूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-३, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-९, पनवेल मनपा-८, नाशिक-३, नाशिक मनपा-१, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, जळगाव-६, जळगाव मनपा-१, नंदूरबार-२, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४, सोलापूर मनपा-४, सातारा-३, जालना-१, लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

No comments:

Post a Comment

Advertise