Type Here to Get Search Results !

कानकात्रेवाडी येथील ‘त्या’ कोरोना बाधिताचा दुर्दैवी मृत्यू


कानकात्रेवाडी येथील ‘त्या’ कोरोना बाधिताचा दुर्दैवी मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या प्रवेशापासून ते आजपर्यंत पहिल्यांदाच कानकात्रेवाडी या एकट्या गावात १५ पॉझिटिव्ह आढळल्याने आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट समोर आला होता. परंतु ज्यामुळे कानकात्रेवाडी  हॉटस्पॉट ठरली होती ‘त्या; मूळ कोरोना बाधिताचा दि. ८ रोजी रात्री ११.३० ला दुर्दैवी मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी सांगितले. 
कानकात्रेवाडी येथील कोरोनाबाधित रूग्णामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. कोरोना बाधित रुग्ण एकमेकांच्या संपर्कात व ते कोणा-कोणाच्या संपर्कात आले आहेत काय, याची पडताळणी आरोग्य विभागाकडून सुरु आहे. समूह संसर्गाला थांबवायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. मास्क वापरा, हात वेळोवेळी धुवा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies