मुंबईतील इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू ; घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 17, 2020

मुंबईतील इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू ; घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट


मुंबईतील इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू ; घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई :  मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहे. अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता भीती आहे. दरम्यान 15 तास उलटून गेल्यानंतरही बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबईत सलग दोन ते तीन दिवस पाऊस सुरु आहे. त्यातच काल गुरुवारी (16 जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास भानुशाली इमारतीचा मोठा भाग कोसळला. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सांवत, मुंबई महापालिका आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही त्यांनी माहिती घेतली होती. जखमींना उपचारांसाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख मदत देण्याची घोषणा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise