नेलकरंजी व कौठूळी येथील कंटेनमेंट झोन आराखडा अंमलबजावणीस सुरूवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 16, 2020

नेलकरंजी व कौठूळी येथील कंटेनमेंट झोन आराखडा अंमलबजावणीस सुरूवात


नेलकरंजी व कौठूळी येथील कंटेनमेंट झोन आराखडा अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी (बाबू नरसुचीवस्ती) व कौठूळी (कारखाना वसाहत) हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन नेलकरंजी (बाबू नरसुचीवस्ती) - नेलकरंजी (बाबू नरसुचीवस्ती) गावाच्या उत्तरेस शंकर नारायण भोसले यांची शेतजमिन (गट नं. 1538), दक्षिणेस मोहन बाजी भोसले यांचे घर (मिळकत नं. 1246), पूर्वेस चंद्रकांत श्रीरंग पाटील यांची शेतजमिन (गट नं. 1522), पश्चिमेस वसंत कृष्णा जाधव यांची शेतजमिन (गट नं. 1562). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन कौठूळी (कारखाना वसाहत) - कौठूळी (कारखाना वसाहत) गावाच्या उत्तरेस अशोक लक्ष्मण सावंत यांचे घर (मिळकत नं. 658, दक्षिणेस जि.प. शाळा कौठूळी (मिळकत नं. 799), पूर्वेस भारत सुखदेव कदम यांची शेतजमिन (गट नं. 710), पश्चिमेस नवनाथ कोंडीबा कदम यांची शेतजमिन (गट नं. 747). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन नेलकरंजी (बाबू नरसुचीवस्ती) - नेलकरंजी (बाबू नरसुचीवस्ती) गावाच्या उत्तरेस अभिमन्यू रामचंद्र भोसले यांचे घर (मिळकत नं. 721), दक्षिणेस राजकुमार सुखदेव भोसले यांचे घर (मिळकत नं. 1459), पूर्वेस बबन निवृत्ती घाडगे यांचे घर (मिळकत नं. 1165), पश्चिमेस विलास शहाजी शिंदे यांची शेतजमिन (गट नं. 1569).
बफर झोन कौठूळी (कारखाना वसाहत) - कौठूळी (कारखाना वसाहत) गावाच्या उत्तरेस महात्मा गांधी हायस्कुल (मिळकत नं. 662), दक्षिणेस पुजारवाडी (आ.) हद्द, पूर्वेस सिताराम विठोबा लिगाडे यांचे घर (मिळकत नं. 657), पश्चिमेस उत्तम राऊबा कदम यांची शेतजमिन (गट नं. 736) सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise