शेळकबाव हायस्कूलच्या यशाची उत्तुंग भरारीची परंपरा कायम: संग्रामसिंह देशमुख - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

शेळकबाव हायस्कूलच्या यशाची उत्तुंग भरारीची परंपरा कायम: संग्रामसिंह देशमुख


शेळकबाव हायस्कूलच्या यशाची उत्तुंग भरारीची परंपरा कायम: संग्रामसिंह देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : डोंगराई विकास संस्था, कडेपूर संचलित शेळकबाव हायस्कूलने कला कौशल्याने अल्पावधीत शाळेच्या यशाची उत्तुंग भरारीची परंपरा कायम राखली आहे, असे प्रतिपादन संग्रामसिंह देशमुख यांनी केले.ते कडेपूर ता. कडेगाव येथे शेळकबाव विद्यालयाचा विद्यार्थी ओम शंकर कदम याची नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये प्रवेश प्रक्रियेत निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेगाव मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयवंतराव जाधव,शेळकबाव विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत निकम यांच्या हस्ते ओम शंकर कदम याचा सत्कार करण्यात आला. तसेच अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात कडेगाव तालूक्यातून शेळकबाव हायस्कूलचे नाव शिक्षणक्षेत्रात अग्रेसर आहे. येथील शिक्षकांनी सातत्याने नवोपक्रमातून कला, क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धापरीक्षातून शाळा व संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी योगदान दिले आहे. ओम कदम याला जिल्हा परिषदेचे शिक्षक, शेळकबाव हायस्कूलचे शिक्षक, पालक यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने यश संपादन झाले आहे. ओम ने विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शंकर कदम,स्वप्नाली कदम तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise