कलाकार मानधनाचे प्रस्ताव ३१ जुलै पर्यंत द्या : गुडेवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

कलाकार मानधनाचे प्रस्ताव ३१ जुलै पर्यंत द्या : गुडेवार


कलाकार मानधनाचे प्रस्ताव ३१ जुलै पर्यंत द्या : गुडेवार
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली सन 2019-20 ते 2020-2022 या तीन वर्षाकरिता जिल्हास्तरीय वृध्द साहित्यीक व कलाकार मानधन समितीची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या समितीची प्रथमत: आढावा बैठक दिनांक 25 जून रोजी घेण्यात आली. समाज कल्याण विभागाकडे पंचायत समिती स्तरावरुन एकूण 355 कलाकार मानधन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आढावा बैठकीमध्ये माहे 31 जुलै 2020 अखेर कलाकार मानधन प्रस्ताव देण्याबाबत कलाकार निवड समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी अवाहन केले आहे. सन 2019-20 या वर्षाकरिता इच्छुक कलाकारांनी पंचायत समिती मार्फत पात्र कलाकारांचे प्रस्ताव दिनांक 31 जुलै  पर्यंत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगलीकडे पाठवावेत, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी केले आहे.
 इच्छुक कलाकारांनी प्रस्तावासोबत विहित नमुन्यातील अर्ज, 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेबाबतचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला), उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला (रु 48000/- पर्यंत), आकाशवाणी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर प्रमाणपत्रे, कार्यक्रम व कार्याचे पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स/रहिवाशी दाखला, 100 रु स्टाँपवर नोटरी इत्यादी, कलाकाराचे आधार लिंक केलेल्या नॅश्नलाईज बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात यावीत. तद्नंतर पात्र प्रस्तावांचा विचार जिल्हास्तरीय वृध्द मान्यवर कलाकार समिती करणार आहे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार व समिती सदस्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise