सांगोला येथे महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ; मुख्य आरोपीसह ४ जण अटकेत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 13, 2020

सांगोला येथे महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ; मुख्य आरोपीसह ४ जण अटकेत


सांगोला येथे महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ; मुख्य आरोपीसह ४ जण अटकेत
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला येथील महिलेला माझा घटस्फोट झाला असल्याची बतावणी करून तिच्यावर बलात्कार करून रोख १ लाख २५ हजार  व १ लाख १० हजार किमतीचे सोने लंपास केल्या प्रकरणी मुख्य आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव रा. मळोली ता. माळशिरस, जि. सोलापूर याच्यासह ४ आरोपी विरुद्ध भादवि कलम ३७६(ड), ४५२, ३९४, ४२०, ३६३, ३४४, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे नोंद झाले आहेत.
 याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालक्यातील पिडीत महीलेने यातील मुख्य आरोपी अरुणसिंह फत्तेसिंह जाधव रा.मळोली ता.माळशिरस व त्याचे सहकारी आरोपी यांचे शारीरीक, मानसिक वाचक त्रासाला कंटाळून त्यांनी आरोपी विरूध्द तकार दिल्याने नमूदचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ०३/०१/२०२० रोजी ११:00 वा पासुन ते दि.०९/०७/२०२० रोजी पहाटे ०५:१४ वा पर्यंत यातील आरापी नामे अरुणसिंह फत्तेसिंह जाधव रा.मळोली ता. माळशीरस याने तो स्वत: घटस्फोटीत असल्याचे खोटे सागुन फिर्यादीची फसवणूक करण्याच्या इरदयाने व तो घटस्फोटीत असल्याने फिर्यादी पिडीत यांचेशी लग्न करण्याच्या बहाण्याणाने तिचा विश्वास संपादन करून स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा या हेतने फिर्यादी यांचेकडून १,१०,०००/- रू. किमतीच सोने व १,२५,०००/- रु रोखीने अशी मालमत्ता फसवून घेतली. व फिर्यादी यांना भावी आयुष्याकरीता वेगवेगळी आश्वासने दिली. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने फिर्यादी यांनी लग्न करण्यास नकार दिला. 
त्यामुळे आरोपीने दि. २०/०१/२०२० रोजी रात्री ११:४५ वाचे सुमारास त्यांची स्वीफ्ट गाडी नं. एमएच १२ इएम ७५४१ यातुन फिर्यादी यांचे घरात येवून शिवीगाळी मारहाण करुन त्यांचेवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यावेळी अब्रु जाईल या भितीन फिर्यादी यांनी तक्रार दिली नाही. त्यानंतर वारंवार गाडीतुन फिर्यादी यांचे घरी येवुन फिर्यादी यांना दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर १५ मार्च रोजी रात्री ११:00 वाच्या सुमारास फिर्यादी यांना त्यांचे राहते घरातून आरोपीत नामे अरुण जाधव याने त्याचे साथीदार आरोपी नामे राजु खान, राजु गोसावी, प्रशांत चंदनशिव यांच्या मदतीने जबरदस्तीने उचलुन त्याच्या स्वीफ्ट गाडीत घालुन मळोली येथील आरोपीत नामे अरुणसिंह जाधव यांच्या शेतातील वस्तीवर सुमारे २० ते २२ दिवस डाबुन ठेवुन पायातील कोल्हापुरी चप्पलने व कातडी बेल्टने मारहाण केली व दमदाटी शिवीगाळी करीत त्यांचेवर त्यांचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला.व इतर आरोपींनी त्यास मदत करून फिर्यादी यांना मानसिक त्रास देत तिच्यावर पाळत ठेवली व याबाबत कोणाला काही सांगीतले किंवा तक्रार दिली तर खलास करीन अशी धमकी दिली. व त्यानंतर सुध्दा यातील आरोपी अरूणसिंह जाधव याने त्याच्या वर नमूद साथीदारासह फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने जावून फिर्यादी यांना लग्नाच्या कारणावरुन शिवीगाळी करून हाताने मारहाण केली. फिर्यादी यांचे घरातील कपाटात ठेवलेले २५०००/- रु व ७0000/-  किमतीचे सोन्याचे दागीने जबरदस्तीने घेवुन गेला आहे. त्यामुळे यातील पिडीत महीला रा. सांगोला यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सांगोला पोलीसांनी कौशल्याने तांत्रिक दृष्टया तपास करून गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासात गन्हयातील आरोपीत नामे १) अरुण फत्तेसिंह जाधव, वय ४८ वर्षे, रा. मळोली, ता. माळशीरस, जि.सोलापुर,२) राजूद्दीन उर्फ राज गोरा खान,वय ४० वर्षे, रा.हॉटेल राहूल, साळमुख फाटा, ता.माळशिरस, मुळ रा.नालीबर, ता.जि.जगतसिंगपूर, राज्य-ओरीसा, ३)प्रशांत सुरेश चंदनशिवे, वय २५ वर्षे,रा.वेळापूर, ता.माळशीरस,जि.सोलापुर, ४) राजेंद्र उर्फ राजु दिनकर पुरीगोसावी,वय ४८ वर्षे,व्यवसाय-मजूरी, रा.अरूणसिंह जाधव याच्या शेतात,मळोली, ता.माळशिरस, मुळ रा.मुस्ती ता.दक्षिण सोलापूर,५) राकेश उर्फ राका जटाधारी नायक, वय २३ वर्षे, रा.हॉटेल राहूल, साळमुख फाटा, ता.माळशिरस. मळरा तितीरा ता.जि.जगतसिंगपूर, राज्य-ओरीसा यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने तसेच त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तर नमूद आरोपीकडे दि.११/०७/२०२० रोजी ते दि.१२/०७/२०२० रोजीपर्यंत चौकशी करून गन्हयाचा तपास केला असून त्यांचेकडून पोलीस कोठडी दरम्यान गुन्हयात वापरलेली कोल्हापुरी चप्पल ,कातडी बेल्ट व गन्हयात वापरलेली स्विफ्ट गाडी पंचनाम्यादरम्यान हस्तगत करण्यात आली आहे. नमूद आरोपीकडे अजून तपास चालु आहे यातील मख्य आरोपीत नामे अरूणसिंह फत्तेसिंह जाधव हा सराईत आरोपीत असून त्याच्यावर वेळापूर पोलीस ठाणे येथे गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद आहे.
सदर गन्हयाचा तपास मनोज पाटील सो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण, अतुल झेंडे सो.अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण, दत्तात्रय पाटील सो,उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा. पोनि राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत हुले हे करीत असून त्यांना, सपोफौ ढवणे, पोना पर्वते. पोशि भोसले,पोशि देशमुख, पोशि इरकर, कुलकर्णी यांनी मदत केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise