Type Here to Get Search Results !

महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक

महाळुंग येथील कोविड केअर सेंटर

महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटरला आयएसओ – 9001 : 2015 मानांकन  प्राप्त झाले आहे. आरोग्य वर्धिनी इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरला आयएसओ  मानांकन मिळाल्याबद्दल  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. या आरोग्य केंद्राला अशा प्रकारे बहुमान मिळाल्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान आहे. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
या सेंटरमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर यंत्रणा बसविण्यात आली आहे. आर.ओ. प्लांट, अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची सुविधा लोकसहभागातून  करण्यात आली आहे. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी  तसेच स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ  24 तास उपलब्ध आहे.  कोरोना बाधित रुग्ण व संशियत रुग्ण तपासणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी कर्मचारी यांना पीपीईकिट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, हॅण्ड ग्लोव्हज् तसेच उपचारासाठी  पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.
महाळुंग येथील कोविड केअर सेंटर iso

तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रातून अथवा इतर ठिकाणाहून संशयित रुग्णांना सेंटरमध्ये आणले जाते.  तपासणीनंतर तो संशियत आहे की कोरोना बाधित   रुग्ण आहे त्यानुसार विभागणी करुन संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येते.  संशयित रुग्णांसाठी 34 बेडची तर कोरोना बाधित रुग्णांसाठी 18 बेडची व्यवस्था करण्यात आली.  दाखल रुग्णांना प्राथमिक सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये दैनंदिन वापरासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, कपड्यांचा व अंगाचा साबण, तेल, पावडर, टॉवेल, नॅपकिन आदी वस्तू दिल्या जातात.  रुग्णांना पौष्टिक आणि सकस आहार दिला जातो.  आहार प्रत्येकाला डिस्पोजेल प्लेट व ताटात  दिला जातो, असे डॉ.रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अधिकाऱ्यांचे कौतुक
महाळुंग येथील कोविड केअर सेंटरला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी अकलूज तालुका आढावा बैठकीवेळी प्रांताधिकारी शमा पवार, तहसिलदार अभिजीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुप्रिया खडतरे यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली केंद्रास भेट
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नुकतीच महाळुंग कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली.  यावेळी त्यांनी आयुष वैद्यकीय अधीकारी, परीचारिका, यांच्याशी संवाद साधला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies