सांगोला (पुजारीवाडी) येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 13, 2020

सांगोला (पुजारीवाडी) येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह


सांगोला (पुजारीवाडी) येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : मौजे सांगोला ता. सांगोला येथील एका पुरुष रुग्णांचा दिनांक 13/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर पुरुष व्यक्ती मौजे सांगोला (पुजारीवाडी) ता. सांगोला येथील स्थानिक रहीवासी आहे. 
याबाबत वस्तुस्थिती अशी की, सदर पुरुष व्यक्ती हि 72 वर्षाची आहे. दोन दिवसापुर्वी सदर व्यक्तीस त्रास जाणवु लागल्याने सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आली होती परंतु उपचार करणेवळी प्राथमिक चौकशी मध्ये आधिक त्रास असलेने सदर व्यक्तीस सोलापूर येथे पाठविणेत आलेले होते. सोलापूर येथेच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल घेणेत आलेला होता तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचेवर सोलापूर येथे उपचार चालु आहेत.
सदर पुरुष व्यक्तीचे संपर्कात आलेले हाय रिस्क संपर्क (high risk contacts)  आणि लों रिस्क संपर्क (low risk contacts) शोधणेचे कामकाज सुरु करणेत आलेले आहे.  सांगोला शहर व परीसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करणेची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरु करणे आलेली आहे. तसेच आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षणाचे कामकाजाचे नियोजन सुरु करणेत आले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच मौजे वाकीघेरडी ता. सांगोला येथील एक पुरुष व्यक्ती पॉझिटिव्ह असुन त्याचेवर सोलापूर येथे अलहीदा उपचार सुरु आहेत. सदर व्यक्तीचे निकट संपर्कातील 7 high risk contacts यांचेवर मेडशिंगी कोविड केअर केंद्रामध्ये उपचार चालु आहेत. उपचारा दरम्यान त्यांचे कोरोना चाचणी अहवाल घेणेत आलेले होते त्या 7 जणांचे अहवाल आज रोजी निगटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन उप विभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले यांनी नागरिकांना केले आहे.

 
 

No comments:

Post a Comment

Advertise