संपादकीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेचा अपेक्षा भंग.....! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

संपादकीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेचा अपेक्षा भंग.....!


संपादकीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेचा अपेक्षा भंग.....!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणामुळे भारतातील जनतेचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. कारण जनतेची अशी अपेक्षा होती की, ' कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी नरेंद्र मोदी काही तरी ठोस उपाय योजनांची घोषणा करतील, त्याच बरोबर चीनच्या विरोधात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन चीनची घमेंड उतरवतील तसेच लॉकडाऊन मुळे गरीब, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार व मध्यम वर्गीय तसेच नोकरी गेल्यामुळे बेरोजगार झालेल्यां व्यक्तींना पुन्हा रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून देण्या संदर्भात  महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करतील, अशी सर्व भारतीयांची अपेक्षा होती. मात्र पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या नियंत्रना संदर्भात मोजकेच विचार मांडले व जनतेला कोरोनाच्या बाबतीत सरकारवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बना. अशी सूचनाच अप्रत्यक्ष त्यांच्या संभाषणातून देण्यात आली आहे. तसेच चीनने भारतावरती आक्रमण करून 20 भारतीय जवानांचा बळी घेतला आहे. एवढेच नाही तर भारताच्या काही भूभागावर चीनने कब्जा ही केला आहे, यासंदर्भात भारत सरकारची नेमकी भूमिका मांडणे अपेक्षित असताना विषयाला  आपल्या संभाषणातून बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब व मध्यम वर्गीय लोकांची सहानुभूती मिळावी, म्हणून नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक lव्यक्तीला पाच किलो तांदूळ, किंवा गहू तसेच एक किलो डाळ देण्याची घोषणा केली आहे, त्यांची खरे तर गरज नव्हती.
कारण लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अगोदरच्या योजनांना मुदतवाढ देण्याचा निर्णय हा प्रशासनाचा असल्यामुळे, त्यांच्या विषयी पुन्हा  देशाला संबोधून सांगण्याची गरज नव्हती. पंतप्रधान या नात्याने कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय व त्याचबरोबर जनतेची नेमकी भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शनाची अपेक्षा होती. तसेच भारत आणि चीन यांच्यामध्ये ज्या सीमारेषेवर धुसफूस चालू आहे त्यासंदर्भात चीनला जाब विचारण्यासाठी भारताची भूमिका काय असेल?  याविषयी संबोधून भाषण करणे अपेक्षित होते. मात्र कोरोणाच्या भयानक परिस्थितीमध्ये लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य आणि गरीब जनतेला अन्नधान्य देण्याच्या घोषणा करून त्यांना भावनिक बनवायचं आणि त्यांच्या भावनिकतेवर राजकारण करून सत्तेची चावी आपल्या खिशात ठेवायची. हाच त्यांचा हेतू दिसतोय, कारण पुढच्या काही दिवसात बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.  त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वसामान्य व गरीब जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुन्हा धान्य वाटप व डाळ वाटप या सारख्या घोषणा ज्या प्रशासनाच्या होत्या त्या पंतप्रधानांनी घोषित का केल्या आहेत? या गोष्टीचे उत्तर शोधणे अवघड आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी अशा विषयावरच जनतेशी सुसंवाद साधायला हवा होता की ज्यामुळे कोरोना ने भयभीत झालेल्या भारतीय जनतेच्या मनामध्ये साहस निर्माण होईल व भक्कम पणे कोरोना महामारीला पराभूत करून भारतीय जनता पूर्ववत आपली वाटचाल चालू ठेवेल. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन सापडणाऱ्या कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या वर केली जाणारी ट्रीटमेंट व त्यांच्या साठी लागणारी औषधे, वैद्यकीय विभागासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा व संरक्षण, त्याच बरोबर लॉकडाऊन व अनलॉक डाऊन यासंदर्भात जनतेला दिलासा मिळेल व कोरोनाची भीती नष्ट होईल व जनता कोरोनाच्या विरोधात दोन हात करायला तयार राहील, अशा पद्धतीचे संबोधनात्मक भाषण नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षित असताना त्यांनी महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन अन्नधान्य व आक्टो बर नोव्हेंबर महिन्यात येणारे देवाधर्माचे धार्मिक कार्यक्रम या गोष्टीवरतीच विनाकारण चर्चा केली आहे. या वरून सरकारला  जनतेची किती काळजी आहे? याची प्रचिती येते व वाटते की भारतात कोरोनाच्या महामारी ने थैमान घातलेले असताना या समस्येकडे नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. केंद्रातील सरकारच्या विरोधात जी राज्य सरकारे  यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना कमकुवत बनवणे तसेच साम, दाम, दंड ,भेद या नियतीचा उपयोग करून त्या राज्यात सत्ता स्थापन करणे याकडेही मोदी सरकारचे बारीक लक्ष आहे.

No comments:

Post a Comment

Advertise