अज्ञात कारणावरून महिला वकिलाने केली आत्महत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

अज्ञात कारणावरून महिला वकिलाने केली आत्महत्या


अज्ञात कारणावरून महिला वकिलाने केली आत्महत्या
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा येथील माहेर असलेल्या अॅ ड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेने बुधवार दि.1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अॅथड.स्मिता हिचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांचेसमवेत 6 मे 2018 रोजी झाला असून त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या. बुधवार दि. 1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी सोलापूरातील जुनी पोलिस लाईन मुरारजी पेठ येथील राहते घरी पहिल्या मजल्याच्या बेडरूम मध्ये अज्ञात कारणावरून नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली. उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच ती मयत झाली. याबाबत  डॉ. अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise