Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द


आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे व लेंगरेवाडी हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर क्षेत्रात शेवटचा बाधित रूग्ण दि. 4 जून रोजी निदर्शनास आले असून तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही. सदर झोनचे 28 दिवस 2 जुलै रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी केलेल्या अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दि. 3 जुलै 2020 पासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies