आटपाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राम कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

आटपाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी राम कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांची निवडआटपाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : आटपाडी तालुका वकील संघटनेच्या निवडी संपन्न झाल्या असून अध्यक्षपदी राम कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
आटपाडी तालुका वकील संघटनेची मंगळवारी वार्षिक सभा संपन्न झाली यावेळी या निवडी करण्यात आल्या. यामध्ये सचिवपदी दिलीप पाटील तर सह सचिवपदी विजय सावंत यांची निवड करण्यात आली. या बैठकीत सन २०१०/२०२० या कालावधीतील पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने सन २०२०/२०२१ या सालासाठी नवीन निवडी करण्यात आल्या. सदरच्या निवडी व्ही.बी. पाटील यांनी जाहीर केल्या.
यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वकील सर्वश्री पी.डी. जेडगे, व्ही.एस.दाणी, आर.बी. कुलकर्णी, डी.एल. पाटील, श्री. शिंदे, श्री. आत्तार, श्री. पटेल, के.डी.भिंगे, व्ही.पी. देशमुख, सतीश देशमुख, प्रवीण देशमुख, जितेंद्र महामुनी, सचिन सातपुते, श्री. निचळ, सागर पाठक आदी प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise