Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात कानकात्रेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह


आटपाडी तालुक्यात कानकात्रेवाडी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर पुरुष हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून दिनांक २४ जून रोजी आला होता. त्याला कानकात्रेवाडी येथे क्वारंनटाइन करण्यात आले होते.
त्याला त्रास होवू लागल्याने व कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याचा दिनांक १ जुलै रोजी त्याचा स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies