Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रभर काम केलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टीची भाषा एका तालुक्यातील पदाधिकारी यांनी करण्यापेक्षा स्वतःचे काम वाढवा : प्रा.एन.पी.खरजे

महाराष्ट्रभर काम केलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टीची भाषा एका तालुक्यातील पदाधिकारी यांनी करण्यापेक्षा स्वतःचे काम वाढवा : प्रा.एन.पी.खरजे
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/वार्ताहर : नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर धनगर तसेच इतर समाजातील  हजारो तरूणांनी चर्चा करून निर्णय घेतला आहे असे दिसून येते. प्रत्येकाला कोणत्या पक्षात, संघटनेत काम करायचे ते आम्ही स्वतः ठरवायला समर्थ आहोत व त्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला नक्कीच आहे. आम्ही या अगोदरही सविस्तरपणे सांगीतले आहे की, बरेच वर्षे कोणत्याही पदावर नसतानाही पदावर असणाऱ्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे ठेऊन निस्वार्थीपणे आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी काम केले आहे. त्यामुळे एका तालुक्यातील पदाधिकारी दुसरे तालुक्यातील व इतर महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची हाकलपट्टीची भाषा करणे नक्कीच हास्यास्पद आहे. त्यामुळे आम्ही स्वतः कोणावरही नाराज न होता आमचा मार्ग निवडला याबद्दल कोणाच्याही मनाला लागण्याचा विषयच येत नाही.
गेली कित्येक वर्षे सामाजिक, शैक्षणिक विविध विषयांवर प्रबोधन करण्याची धमक असणारे या कार्यकर्त्यांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नये, ते करताना गेल्या काही दिवसांत आलेल्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपले मत व्यक्त करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष दिले तर नक्कीच बरे होईल. राहिला विषय आपण बोललेल्या पक्ष आदेशाचा तो असा आपण स्वतः जरा गावनिहाय  मतदानाची टक्केवारी घेतली तर तुम्हाला धक्का बसेल आणि तुमच्या म्हणण्यानुसार त्या सर्व मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी  यांची हकालपट्टी झाली असे समजायचे का? असा प्रेमळ हक्काचा सवाल त्यांनी हकालपट्टीची भाषा करणाऱ्याला विचारणे हे एक कर्तव्य बनते. तसेच कोण कोणाची बिल्डींग लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, हे आजच्या काळातील जागृत तरूणांना सांगायची गरजच आहे. ज्यांच्याबरोबर आम्ही काम केले त्यांच्याबद्दल आम्ही कधीही काही बोलणार नाही, पण दुसरे कोणी लोड घेऊ नये आणि महाराष्ट्रभर काम केलेल्या हजारो कार्यकर्ते यांची एका तालुक्यातील हाकलपट्टीची भाषा करण्यापेक्षा स्वतःच काम वाढवले तर बरे होईल असे मत प्रा.एन.पी.खरजे यांनी दैनिक माणदेश एक्स्प्रेस शी बोलताना व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies