अक्षयकुमार चा नाशिक दौरा वादग्रस्त ; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे चौकशीचे आदेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 4, 2020

अक्षयकुमार चा नाशिक दौरा वादग्रस्त ; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे चौकशीचे आदेश


अक्षयकुमार चा नाशिक दौरा वादग्रस्त ; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे चौकशीचे आदेश 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
नाशिक : अभिनेता अक्षय कुमारचा नाशिक जिल्हा दौरा वादात सापडला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या हवाई दौऱ्याच्या चौकशीच आदेश दिले आहेत. अक्षयकुमारच्या या वैयक्तिक दौऱ्याबाबत जिल्हा प्रशासनास सुद्धा कोणतही कल्पना नाही. पोलिसांना अक्षयकुमार च्या दौऱ्याच्या माहिती असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणल्याने या हेलिकॉप्टर दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 
अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गाव या भागात अक्षय कुमारचा दौरा होता, येथील एका शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर अक्षयकुमारच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग होतं. विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागतही केलं जातं. तसेच, अक्षयच्या अंजनेरी शिवारात फिरताना अक्षयकुमारच्या सुरक्षेसाठी एक्स्कॉर्टही पुरविण्यात आला. मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला असून जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वच हॉटेल्स अन् रिसॉर्ट बंद असतानाही, अक्षयसाठी तारांकीत रिसॉर्टचे दरवाजे कसे उघडण्यात आले, येथे अक्षयकुमारचा पाहुणचार कसा झाला? असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अक्षयकुमारच्या संपूर्ण दौऱ्याच्या चौकशीचे आदेश भुजबळ यांनी दिले आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise