..अखेर मंगळवेढा तालुक्यात कोरोना दाखल; आज ग्रामीणमध्ये 43 रुग्ण पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 4, 2020

..अखेर मंगळवेढा तालुक्यात कोरोना दाखल; आज ग्रामीणमध्ये 43 रुग्ण पॉझिटीव्ह


..अखेर मंगळवेढा तालुक्यात कोरोना दाखल; आज ग्रामीणमध्ये 43 रुग्ण पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
 मंगळवेढा/प्रतिनिधी :  सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये आज 43 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रुग्णसंख्या 520 झाली आहे. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून कोरोनापासून चार हात लांब असलेल्या मंगळवेढा तालुक्याआत कोरोना दाखल झाला आहे. पाटकळ गावात एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
सुमित्रा नगर-यशवंत नगर येथे एक (ता. माळशिस), मार्डीत दोन (उत्तर सोलापूर), सबजेल तहसिल ऑफिस येथे दोन, नाईकवाडी प्लॉट, उपळाई रोड येथे एक, भवानी पेठ येथे दोन, पाटील प्लॉट येथे एक, नागोबाची वाडी येथे पाच, वैराग, साकत पिंपरी, उक्कउडगाव (ता.बार्शी) येथे प्रत्येकी एक, बक्षीहिप्परगा, वडापूर, घोडा तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक तर नवीन विडी घरकूल येथे दोन (ता.दक्षिण सोलापूर) रुग्ण सापडले आहेत.
तसेच अक्कनलकोट तालुक्या तील विजय नगरात दोन, बुधवार पेठ, माणिक पेठ, संजय नगर, भिम नगर येथे प्रत्येकी एक, समर्थ नगरात तीन, करजगी येथे एक, जेऊरवाडी येथे दोन, बोरगाव दे. येथे एक रुग्ण सापडला आहे. पंढरपुरातील लिंकरोड येथे दोन, येळे वस्ती येथे एक, करकंब येथे एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील क्रांती नगरात एक तर पाटकळ (ता. मंगळवेढा) एक तर सांगोल्यातील वाकी शिवणे येथील आहे.

No comments:

Post a Comment

Advertise