एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू
एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू 

सांगली : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली असून यामुळे एसटी महामंडळाच्या 28 हजार कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त घेवू शकणार आहेत. सध्या एसटी महामंडळात एकूण 1 लाख 3 हजार कर्मचाऱ्यापैकी 28 हजार कर्मचारी 50 वर्षांपेक्षा पुढील वयाचे आहेत. त्यामुळे एसटी महामंडळात स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याच्या निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.स्वेच्छानिवृत्ती योजना वय वर्षे 50 व त्यापेक्षा जास्त वयाच्या एसटी कर्मचारी व अधिकारी यांना लागू होणार आहे. एसटी महामंडळात निवृत्ती वय 58 वर्ष आहे. एसटी महामंडळाच्या 28 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी त्यांना उर्वरित प्रत्येक वर्षासाठी 3 महिन्याचे वेतन मूळ (वेतनमहागाई भत्ता) देण्यात येणार आहे.
No comments:

Post a Comment

Advertise