सोनू सूदच्या समाजकार्यावर या नेत्याने उपस्थित केली शंका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

सोनू सूदच्या समाजकार्यावर या नेत्याने उपस्थित केली शंकासोनू सूदच्या समाजकार्यावर या नेत्याने उपस्थित केली शंका

मुंबई : लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच वाहतूक सेवा बंद असल्यामुळे मजुरांनी पायीच घरचा रस्ता पकडला होता. त्यावेळी अनेक स्थलांतरित मजुरांची अभिनेता सोनू सूदने स्व:खर्चाने घरवापसी केल्यामुळे सध्या सोनू सूदचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनीही त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर त्याच्या या समाजकार्यावर एक शंकाही उपस्थित केली आहे.


अभिनेता सोनू सूदने केलेल्या कामाविषयी राज ठाकरे म्हणाले, मला एक कळत नाही की, सोनू सूदला ही आर्थिक मदत आली कुठून? या गोष्टी आपल्या थोडसे तपासणे गरजेचे आहे. 


इच्छा प्रत्येकाच्या असतात. पण, शेवटी त्याला आर्थिक बाजू देखील असते. ही आर्थिक बाजू सोनू सूदकडे कुठून आली? सोनू सूद असा फार मोठा कलाकार नाही. पण तो जे करत आहे हे चांगले करत आहे आणि केले देखील असेल. परंतु हे एकट्या सोनू सूदच डोके आहे, असे मला वाटत नाही. याबाबत आपल्याला कालांतराने कळेल यामागे काय काय डोकी होती. आतातरी थांगपत्ता लागत नसल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी आर्थिक स्त्रोतांविषयी शंका उपस्थित केली.


No comments:

Post a Comment

Advertise