इस्लामपूरात एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 31, 2020

इस्लामपूरात एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्याइस्लामपूरात एसटीमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या 


इस्लामपूर : इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (35) याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:च्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील पेठ येथील गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून त्याने आत्महत्या केली. तो इस्लामपूर आगारात मेकॅनिकल विभागात नोकरीस होता. 


आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची चर्चा परीसरामधून हॉट आहे. अमोल माळी याच्याच पगारावरच कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र पगार न मिळाल्याने तो आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. तो गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात होता. यातूनच त्याने आपली जीवन यात्रा संपवल्याची चर्चा आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 5 वर्षांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी असा परिवार आहे.No comments:

Post a Comment

Advertise