सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर टिकटॉक हटवलं ! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर टिकटॉक हटवलं !


सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर टिकटॉक हटवलं !
मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर गूगल प्ले स्टोअर आणि ॲपलच्या ॲप स्टोअरवरुनही टिकटॉक ॲप हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने सोमवारी (29 जून) संध्याकाळी टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल ॲपवर बंदी घातली. मात्र ज्या युझर्सनी आधीच टिकटॉक ॲप डाऊनलोड केलं आहे, त्यांना ॲपवर व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे. पण आता कोणताही नवा युझर हे ॲप डाऊनलोड करु शकणार नाही.
देशात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. गूगल प्ले स्टोअर आणि ॲपलच्या ॲप स्टोअरमधील टॉप 10 ॲप्सपैकी एक होतं. सरकारने बंदी घातलेल्या इतर ॲप्सपैकी बहुतांश ॲप अजूनही प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहेत. लवकरच हे ॲप्स देखील प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरुन हटवले जातील. यानंतर कोणत्याही नव्या युझरला हे ॲप डाऊनलोड करता येणार नाही.

No comments:

Post a Comment

Advertise