ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी


ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी 
मुंबई : ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देऊ, अशी धमकी देणारा दूरध्वनी सोमवारी पोलिसांना आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. 
कराची येथे दहशतवादी हल्ला झाला होता. पोलिसांच्या गणवेशातील चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. या दहशतवाद्यांनी स्टॉक एक्स्चेंजच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडस फेकले. यानंतर दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरु होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घातले होते.

No comments:

Post a Comment

Advertise