आटपाडी बंद ला पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद ; मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद ; वाहने सोडली तर रस्ते निर्मनुष्य - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

आटपाडी बंद ला पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद ; मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद ; वाहने सोडली तर रस्ते निर्मनुष्य


आटपाडी बंद ला पहिल्या दिवशी १०० टक्के प्रतिसाद 
मेडिकल वगळता सर्व आस्थापने बंद ; वाहने सोडली तर रस्ते निर्मनुष्य
माणदेश एक्स्प्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम आपत्ती समितीने शहरामध्ये तीन दिवस लॉकडाऊन केला असून आज पहिल्या दिवशी आटपाडी शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आली होतो. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. 
कोरोनामुळे जिल्हयात गुरुवारपासून आठ दिवस लॉकडाऊन लागू केली आहे. तर आटपाडीमध्ये शुक्रवार पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. आज सकाळच्या टप्प्यात काही प्रमाणात रस्त्यावर नागरिकांची रेलचेल होती. दूध खरेदीसाठी काही नागरिक घराबाहेर पडले होते. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी अडवून त्यांना पुन्हा घराकडे पाठविले. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रशासकीय कर्मचारी, पोलीसच रस्त्यावर दिसत होते.
लॉकडाऊनमुळे आटपाडी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. रस्त्यावर एखादे दुसरे वाहन जाताना दिसत होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कामा व्यतिरिक्त कुणालाही शहरात अथवा फिरत नव्हते. 

No comments:

Post a Comment

Advertise