दाढी मिशा कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर रोजगार वाढवा ! - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

दाढी मिशा कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर रोजगार वाढवा !


दाढी मिशा कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर रोजगार वाढवा ! मुंबई :  लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. उद्योगधंदे बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना संक्रमणाची साखळी मोडता यावी यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे संपूर्ण देश हा दोन ते अडीच महिने घरात बसून होता. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते.


 याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि सेवा व उद्योग क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा सर्वांचा परिणाम जीडीपीवर झाला आहे. तसेच देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. दरम्यान या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वेगळा लूक पाहायला मिळाला. पंतप्रधानांनी दाढी व मिशा वाढवल्या आहेत. याच कारणावरुन काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाण साधला आहे.काँग्रेसचे नेते राजीव सातव टिवट करत म्हणाले, ’हिंमत असेल तर जीडीपी, रोजगार वाढवा. दाढी मिशा तर कोणीही वाढवू शकतो,’ असा टोला मोदींना लगावला आहे. सातव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या लूकचा संदर्भ देत त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

No comments:

Post a Comment

Advertise