आटपाडी तालुक्यातील हिवतड-माळेवाडी, गोमेवाडी (अर्जुनवाडी), तडवळे, शेटफळे येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 20, 2020

आटपाडी तालुक्यातील हिवतड-माळेवाडी, गोमेवाडी (अर्जुनवाडी), तडवळे, शेटफळे येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


आटपाडी तालुक्यातील हिवतड-माळेवाडी, गोमेवाडी (अर्जुनवाडी), तडवळे, शेटफळे येथे 
कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील हिवतड-माळेवाडी, गोमेवाडी (अर्जुनवाडी), तडवळे, शेटफळे येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन हिवतड-माळेवाडी - हिवतड (माळेवाडी) गावाच्या उत्तरेस जगन्नाथ भोजा माळी यांची शेतजमिन (गट नं. 1035), दक्षिणेस हिवतड - मेटकरवाडी रस्ता, पूर्वेस भिमराव सिदा डोंबाळे यांची शेतजमिन (गट नं. 1035), पश्चिमेस पांडुरंग कृष्णा माळी यांची शेतजमिन (गट नं. 910). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन - हिवतड (माळेवाडी) गावाच्या उत्तरेस ओढापात्र, दक्षिणेस पंजाब शामराव डोंबाळ यांची शेतजमिन (गट नं. 948), पूर्वेस शंकर ज्ञानू बर्गे यांची शेतजमिन (गट नं. 996), पश्चिमेस तानाजी निवृत्ती माळी यांची शेतजमिन (गट नं. 1092).
 कंटेनमेंट गोमेवाडी (अर्जुनवाडी) - गोमेवाडी (अर्जुनवाडी) गावाच्या उत्तरेस उत्तम बाळा अर्जुन यांची शेतजमिन (गट नं. 1330), दक्षिणेस बजरंग आप्पा अर्जुन यांची शेतजमिन (गट नं. 1365), पूर्वेस नामदेव नाना राजगे यांची शेतजमिन (गट नं. 1350), पश्चिमेस तानाजी तुळशीराम वाघमोडे यांची शेतजमिन (गट नं. 1333). या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.  बफर झोन - गोमेवाडी (अर्जुनवाडी) गावाच्या उत्तरेस किसन जगन्नाथ अर्जुन यांची शेतजमिन (गट नं. 1307), दक्षिणेस अर्जुनवाडी तलाव, पूर्वेस बाबू गणू मंडले यांची शेतजमिन (गट नं. 1448), पश्चिमेस दिलीप यशवंत वाघमोडे यांची शेतजमिन (गट नं. 1280).
कंटेनमेंट झोन तडवळे - तडवळे गावाच्या उत्तरेस  शंकर आबा कदम यांचे घर, दक्षिणेस माणिक मारूती मोटे यांचे घर, पूर्वेस सदाशिव राजाराम गिड्डे यांची शेतजमिन, पश्चिमेस सांगली - आटपाडी रस्ता.  या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन -  तडवळे गावाच्या उत्तरेस  अशोक संतू यांचे घर, दक्षिणेस विठ्ठल शहाजी शेंडे यांची शेतजमिन, पूर्वेस दुर्योधन जोतीराम गिड्डे यांचे घर, पश्चिमेस अरविंद रामचंद्र गिड्डे यांचे घर.
कंटेनमेंट झोन शेटफळे - शेटफळे गावाच्या उत्तरेस कुंडलीक पांडुरंग कांबळे यांचे घर, दक्षिणेस किसन सदाशिव कांबळे यांचे घर, पूर्वेस आक्काताई सिताराम भजनावळे यांचे घर, पश्चिमेस शेटफळे ते रानमळा रस्ता.  या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन - शेटफळे गावाच्या उत्तरसे शंकर भुजंगराव गायकवाड यांचे घर, दक्षिणेस रावसाहेब संदिपान गायकवाड यांचे घर, पूर्वेस भारत शिवाजी गायकवाड यांचे घर, पश्चिमेस सुरेश विठ्ठल मोकाशी यांचे घर.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise