सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी बांदेकरांची नियुक्ती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी बांदेकरांची नियुक्तीसिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी बांदेकरांची नियुक्तीमुंबई : पुन्हा एकदा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे लाडके भावोजी आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


यापूर्वी हा पदभार 2017 मध्ये त्यांनी स्वीकारला होता. या संदर्भात अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी, विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी बांदेकर यांचे नाव सुचवले होते.24 जुलै 2017 रोजी सर्वप्रथम बांदेकर या ट्रस्टचे अध्यक्ष बनले होते, पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 24 जुलै 2020 पर्यंत ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहणार होते. पण त्यांची आज पुन्हा नव्याने निवड करण्यात आली आहे. सध्या कुठल्याही संस्था, संघटनांच्या निवडणुकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत नाहीत. तर, मंदिर आणि देवस्थानही बंद असल्यामुळे, आदेश बांदेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise