दिघंची येथील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

दिघंची येथील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह


दिघंची येथील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्स्प्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिघंची येथील प्रसिद्ध महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने दिघंची परीसरामध्ये खळबळ माजली आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, आटपाडी तालुक्यातील दिघंची हे शहर व्यापारी पेठ म्हणून सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर आटपाडी शहरा नंतर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून दिघंचीकडे पहिले जाते. दिघंची शहराच्या मेन व्यापारी पेठेमध्ये या महिला डॉक्टरचा प्रसिद्ध व दिघंची परीसरातील सर्वात मोठा दवाखाना आहे. तर सदर महिला डॉक्टर ह्या कोणा-कोणाच्या संपर्कात आल्या याची आरोग्य विभागाकडून माहिती घेण्याचे काम सुरु आहे.


No comments:

Post a Comment

Advertise