नेलकरंजी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

नेलकरंजी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह


नेलकरंजी येथील एकजण कोरोना पॉझिटीव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे एकजण कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
नेलकरंजी येथे पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कामध्ये तो आलेला होता. काल त्याचा कोरोना अहवाल आला त्यामध्ये तो कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यामध्ये कानकात्रेवाडी नंतर नेलकरंजी येथे संपर्कातील आलेल्या लोकांची यादी मोठी आहे. त्यामुळे आणखी किती जण कोरोना पॉझिटीव्ह येणार? असे नागरीकामधून बोलले जावू लागले आहे. या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व सोशल डिस्टस्निंगचा प्रभावी वापर करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise