मंगळवेढा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन अध्यक्षपदी या माजी मंत्र्यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 19, 2020

मंगळवेढा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन अध्यक्षपदी या माजी मंत्र्यांची निवड

लक्ष्मणराव ढोबळे

मंगळवेढा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलन अध्यक्षपदी या माजी मंत्र्यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/नारायण माने : मंगळवेढा येथे १५ व १६ ऑगस्ट रोजी दुसर्यात राज्यस्तरीय साहित्य-संगीत संयुक्त संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री व साहित्यप्रेमी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सुरसंगम म्युझिकल ग्रुप, म.सा.प. दामाजीनगर व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे संमेलन हे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन घेण्यात येणार असून संयोजन समितीच्या झालेल्या बैठकीत प्रा.ढोबळे यांच्या नावाची सुचना नाटय परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी मांडली. त्यास अॅाड. रमेश जोशी यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर म.सा.प. दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांचे हस्ते प्रा.ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती अॅदड. नंदकुमार पवार, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, ज्ञानदीप संस्कार भारतीचे अध्यक्ष संभाजी सलगर, स्व.संजय-सविता वाचनालयाचे राकेश गायकवाड, वृत्त निवेदक राजेंद्रकुमार जाधव, कवी गोरक्ष जाधव, मयुर हजारे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise