आटपाडी तालुक्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 27, 2020

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण


आटपाडी तालुक्यात कोरोनाचे ४ नवे रुग्ण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज कोरोनाचे ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २ पुरुष व २ लहान मुलींचा समावेश आहे. 


आटपाडी वाणी गल्ली परिसरातील पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या तिघांच्या संपर्कातील एक ३ व एक ४ वर्षाच्या लहान मुलींचा रूग्णामध्ये समावेश आहे. तर तालुक्यात दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बाळेवाडी येथे कोरोनाने प्रवेश केला असून मुंबईवरून आलेल्या ५४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर पुरुष हा बाळेवाडी येथील त्याच्या असणाऱ्या वस्तीवर होम क्वारंनटाइन झाला होता. 
तर निंबवडे येथे पॉझिटिव्ह आलेला ३७ वर्षीय पुरुष हा मुंबई वरून आलेला होता. त्यास दक्षता समितीने संस्था क्वारंनटाइन केले होते. सदर पुरुषास त्रास होवू लागला होता व त्यास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने दिनांक २५ रोजी त्याचा स्वाब तपासणीसाठी मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात पाठविणेत आला होता. आज आलेल्या अहवालामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे आटपाडीतील वाणी गल्ली येथील मूळ कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील २ व बाळेवाडी व  निंबवडे येथील प्रत्येकी १ असे आज चोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise