सुनिल पोरे व सहकाऱ्यांच्या पाणी मागणीला यश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, July 27, 2020

सुनिल पोरे व सहकाऱ्यांच्या पाणी मागणीला यश


सुनिल पोरे व सहकाऱ्यांच्या पाणी मागणीला यश
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : कायम दुष्काळग्रस्त माण-खटाव तालुक्यांना पावसाळ्यात पूर नियंत्रणासाठी वाया जाणारे कृष्णा, वेण्णा, उरमोडी नद्याचे पाणी उचलून प्रशासनने स्वखर्चाने द्यावे म्हणून सातत्याने मागणी हॉट असते. 


गतवर्षी 15 ऑगस्टला याच पाणी मागणीसाठी इंजि. सुनील पोरे, पत्रकार पोपट बनसोडे व धनंजय पानसांडे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. दोन दिवस उपोषणानंती प्रशासनाकडून  25 ऑगस्ट 2019 पर्यंत पाणी सोडले जाईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे गत वर्षी 25 ऑगस्ट 2019 ला पाणी माणगंगेत आले होते व पुढे राजेवाडी धरणाकडे गेले होते या पाण्याचे पायगुणाने पुढे डिसेंबर 2019 पर्यंत माणगंगेत पाणी उपलब्ध होते याची दुष्काळग्रस्त जनता साक्षीदार आहे.
याच धर्तीवर प्रशासनाकडून पावसाळ्यात सदर नद्याचे पूर नियंत्रणासाठी वाया जाणारे पाणी दुष्काळग्रस्त माण-खटाव तालुक्यातील नदी पात्रात सोडावे म्हणून इंजि. सुनील पोरे व सहकारी कायम शासनाकडे पाठपुरावा करीत होते त्यानुसार चालु वर्षी प्रशासनाकडून वेळीच दखल घेऊन पाणी सोडण्यात आले होते.  त्यात माण- खटाव तालुक्यातील बंधारे शेंबडे वस्ती म्हसवड पर्यंत भरले होते व प्रशासनाकडून तात्पुरते पाणी सोडणे बंद केले होते. परंतु इंजि.सुनील पोरे व सहकारी याची प्रामाणिक आर्त हाक लक्षात घेऊन निसर्गाने उर्वरित बंधारे भरणेसाठी साथ दिले मुळे थोडे प्रशासन थोडे निसर्ग यांनी इंजि.सुनील पोरे व सहकारी यांच्या मागणीला यश मिळाले अशी माणवासियांची भावना झाली असुन शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise