सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला समोर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, June 25, 2020

सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला समोर


सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला समोर
मुंबई :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या शरीरावर कोणत्याही संघर्षाचे किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहित. त्याचा मृत्यू फाशी घेतल्यानंतर श्वास गुदमरल्यामुळे झाला असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असून त्यामध्ये कोणताही घातपात घडलेला नाही.
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सुशांतचं पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. यादरम्यान, मुंबई पोलिसांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचे वडिल आणि त्याच्या बहिणी, तसेच सुशांतचे मित्र, नोकर आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. सुशांतचा आगामी चित्रपट 'दिल बेचारा'चे दिग्दर्शक मुकेश छाबडा आहेत. यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. 

No comments:

Post a Comment

Advertise