Type Here to Get Search Results !

रामदेव बाबांच्या 'कोरोना किट' ला महाराष्ट्रात विक्रीची परवानगी नाही : गुहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटर वरून


रामदेव बाबांच्या 'कोरोना किट' ला महाराष्ट्रात विक्रीची परवानगी नाही : गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटर वरून 
मुंबई :  पतंजलीकडून निर्माण केलेल्या कोरोनिल आणि श्वासारी या कोरोना किटला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. याआधी राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून चे औषध राज्याचे विक्री होवू देणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे. या औषधाबाबत जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सर्व तपासणी करत असून योगी रामदेव यांच्या बनावट औषधांच्या विक्रीला महाराष्ट्रात परवानगी मिळणार नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोनावरचं औषध असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेला नेमकं हे प्रमाणपत्र दिलं कुणी असा प्रश्न निर्माण झाला असून  केंद्र सरकारनं पतंजलीकडून सगळी कागदपत्रं मागवली आहेतच, पण उत्तराखंड सरकारच्या आयुर्वेद मंत्रालयाच्या परवागनीनंतर हा सगळा दावा केला जात होता, त्यांनीही याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. बाबा रामदेव यांच्या औषधाला आम्ही परवानगी दिली, पण ते औषध केवळ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, ताप आणि खोकल्यावर उपाय म्हणून आम्हाला परवानगी मागितली होती, त्यात कोरोनाचा कुठलाही उल्लेख नव्हता असं उत्तराखंडच्या आयुर्वेदिक औषध परवाना विभागाने स्पष्ट केले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies