गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लावला तर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही : बिरुदेव खांडेकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, June 25, 2020

गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लावला तर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही : बिरुदेव खांडेकर


गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लावला तर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही : बिरुदेव खांडेकर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र भर धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला. आजपर्यंत सर्व सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला. बहुजन समाजातील प्रत्येक मुलाना योग्य वागणूक मिळावी म्हणून गोपीचंद पडळकर यांनी आपले राजकीय क्षेत्र निवडले परंतु एक विधान गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या विरोधात विधान केले तर राष्ट्रवादी मधील काही मुजोर गुंड लोक बोलायला लागली. गोपीचंद पडळकरांच्या तोंडाला काळ फासून चोप देण्यात येईल.
 परंतु जर गोपीचंद पडळकरांच्या केसाला जरी धक्का लावला तर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजप युवा मोर्चाचे बिरुदेव खांडेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवातील कार्यकर्त्यांनी  विचार करून बोलावे. जसे शरद चंद्रजी पवार साहेब तुमचे नेते आहेत तसे गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा आमचे नेते आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते गोपीचंद साहेबांच्या विचारांचा वारसा जपत चालत आहोत. कारण आमच्या नेत्याने आम्हाला रडायचं नाही तर लढायचं आहे हे शिकवलं आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise