आटपाडी तालुक्यात ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह ; शेटफळे, आवळाई, गळवेवाडी येथील रुग्णांचा समावेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, June 25, 2020

आटपाडी तालुक्यात ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह ; शेटफळे, आवळाई, गळवेवाडी येथील रुग्णांचा समावेश


आटपाडी तालुक्यात ३ नवे कोरोना पॉझिटीव्ह
शेटफळे, आवळाई, गळवेवाडी येथील रुग्णांचा समावेश 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये काल तीन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शेटफळे येथील ठाणेहून आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती हा दिनांक १८ रोजी ठाणेहून आला होता. शेटफळे येथे आल्यावर त्याला क्वॉरंनटाईन करण्यात आले होते. परंतु दिनांक २३ रोजी त्याचा कोरोना लक्षणे दिसू लागल्यावर त्याचा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता.
आवळाई येथील मुंबईहून आलेल्या ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती हा दिनांक १७ रोजी मुंबईहून आला होता. आवळाई येथे आल्यावर त्याला संस्था क्वॉरंनटाईन करण्यात आले होते. परंतु त्याचा कोरोना लक्षणे दिसू लागल्यावर त्याचा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. 
गळवेवाडी येथील मुंबईहून आलेल्या ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील व्यक्ती हा दिनांक १७ रोजी मुंबईहून आला होता. आवळाई येथे आल्यावर त्याला संस्था क्वॉरंनटाईन करण्यात आले होते. परंतु त्याचा कोरोना लक्षणे दिसू लागल्यावर त्याचा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. 
या सर्वांचा त्याचा अहवाल काल प्राप्त झाला असून त्यामध्ये तिघांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली असून त्यांना मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात हलविणेत आले आहे. तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंनटाईन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Advertise