Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनमुळे वटपौर्णिमेला कुंडीतील रोपाचा आधार


लॉकडाऊनमुळे वटपौर्णिमेला कुंडीतील रोपाचा आधार
माणदेश एक्सप्रेस न्युज
कवठेमहांकाळ/प्रतिनिधी : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुर, जाखापुर व कुची परिसरात महिलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारा वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळपासूनच महिला वर्गामध्ये या सणाची लगबग दिसून येत होती. पारंपारिक पध्दतीने वडाच्या झाडाला सात जन्माचे फेरे बांधून पतीच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करीत मोठया उत्साहात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या सणानिमित्त महिला अगदी सकाळ पासूनच नवीन साड्या, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कपाळी सिंदूर यासह सौभाग्याचे अलंकार परिधान करून गावातील, गावालगत असणाऱ्या तसेच काही ठिकाणी कुंडीतील वडाच्या झाडाची मोठया भक्तिभावाने पूजन करीत होत्या.
वड हा वृक्ष विशाल पुर्ण साभार असणारा आणि शतकानुशतके जगणारा वृक्ष. त्याच्या सान्निध्यात प्राणवायूचा मुबलक पुरवठा असतो. त्यामुळेच मूर्च्छित अवस्थेत असणाऱ्या सत्यवानाला जीवदान देण्यासाठी याच वृक्षाखाली बसुन सावित्रीने यमाकडे याचना केली होती. त्यामुळे सत्यवानाचे प्राण वाचले होते. तेव्हा पासून पतीच्या दिर्घायुष्यासाठीच प्रार्थना करण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. वडाच्या झाडाभोवती सुत गुंडाळून त्याची मोठया भक्तिभावाने पुजन करून जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करत महिला एकमेकींना वाण देऊन ओटी भरताना दिसत होत्या.
सततच्या दुष्काळाने त्यातच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग व दिघंची-हेरवाड राज्य मार्गासाठी सदर वडांच्या झाडांची मोठया प्रमाणावर तोड झाल्याने महिलांना या सणासाठी कुंडीतील झाडांचा आधार घ्यावा लागला.
Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies