Type Here to Get Search Results !

कोरोना व इतर व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही :अफवांवर विश्वास ठेवू नये ; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते


कोरोना व इतर व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही :अफवांवर विश्वास ठेवू नये ; जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने कोरोना व इतर रोगाची लागण होत असल्याच्या अफवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. मात्र कोरोना व इतर व्हायरसचा कोंबड्यांशी संबंध नाही. कोणताच व्हायरस 56 डिग्री तापमानाच्यावर तग धरू शकत नाही. आपल्याकडे कोणतेही मांस हे शिजवूनच खाल्ले जाते. त्यामुळे सदर अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे. 
डॉ. संजय धकाते म्हणाले, सध्या जगात कोरोना व इतर व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधीत झालेल्या रूग्णांची संख्या वाढत असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुटपक्षी पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सोशल मिडीयावर कोंबड्यांचे मांस खाल्ल्यामुळे कोरोना व इतर रोगांचा प्रसार होतो अशी चुकीची माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. मात्र असा कोणताचा प्रकार नसून कोंबडीचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षीत असल्याचा दावा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केला आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत कोरोना व इतर व्हायरस विषयी जिल्ह्यात जनजागृती करण्याचा सूचना डॉ. संजय धकाते यांनी अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies