Type Here to Get Search Results !

चिकमहूदमध्ये रक्तदान शिबीर संपन्न


चिकमहूदमध्ये रक्तदान शिबीर संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज
महुद/वार्ताहर : देशांमध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यामध्येही रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करा असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दि. 4 जून रोजी चिक-महूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिक-महूद ग्रामपंचायतीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी रक्तदात्यांना किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. 
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ जीवनदान असल्यामुळे सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन इतर गरजवंतांना जीवदान देण्यामध्ये हातभार लावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. हे रक्तदान शिबिर लोटेवाडी, चिक-महूद, यासह अनेक गावांमध्ये घेण्यात आले आहे. इथून पुढेही प्रत्येक ग्रामपंचायती आणि तेथील नेतेमंडळींनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त गावातील लोकांना रक्तदान करण्यास सांगावे असेही आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार शहाजी (बापू) पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र कदम, ग्रामविकास अधिकारी कोळी भाऊसाहेब, तलाठी तनमोर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम, माजी उपसरपंच बाळदादा भोसले, कालिदास भोसले, संभाजी शिंदे, सूर्यकांत घाडगे, स्वप्निल वाघमारे, निलेश केंगार, सुभाष भोसले, रेवनिल ब्लड बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies