ग्रामीण भागात धावू लागली लालपरी…. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, June 12, 2020

ग्रामीण भागात धावू लागली लालपरी….


ग्रामीण भागात धावू लागली लालपरी….
माणदेश एक्सप्रेस न्युज
घेरडी/वार्ताहर : बऱ्याच दिवसापासून बंद असलेली लालपरी चक्क ग्रामीण भागात धावू लागली. कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेतील मध्यमवर्गीय व गोरगरीब प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस काल प्रथमच सांगोला ते   रडडे् या मार्गावर धावली. परंतु लोकामध्ये असलेल्या भितीमुळे प्रवासी संख्या अगदी बोटावर मोजता येईल अशीच होती.
 परंतु ग्रामीण भागात लाँकडाऊनच्या काळात बंद असलेली एसटी बस सुरू झाल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच काळजी घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेऊ अशी इच्छा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. सदर एसटी बसच्या माध्यमातून पहिल्या दिवशी फक्त 400 रुपये इतकी कमाई झाली. परंतु हि लालपरी प्रवाशांना सेवा देताना कायमस्वरूपी नफा तोट्याचा विचार करत नाही. हि फक्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत राहते. 
आपली काळजी घेऊन प्रवास करावा. तसेच बसमध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ नाही. जी पहिल्यापासून आहे तेच प्रवास भाडे राहील. एसटी बसच्या मालवाहतूक हि सुरू आहे याचा हि लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise