Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात 5511 मे.टन खत व 2406 क्विंटल बियाणांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप ; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी : महाबीज व खाजगी कंपन्या मार्फत 23 हजार 580 क्विंटल बियाण्याचा पुरवठा : बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात


सांगली जिल्ह्यात 5511 मे.टन खत व 2406 क्विंटल बियाणांचे शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी : महाबीज व खाजगी कंपन्या मार्फत 23 हजार 580 क्विंटल बियाण्याचा पुरवठा : बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गट, शेतकरी मित्र, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप करण्यात येत आहे. दि. 6 जून अखेर 5511 मे. टन खत व 2406 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
खरीप हंगाम 2020-21 करिता सांगली जिल्ह्यचे 3 लाख 48 हजार 600 हेक्टर लक्षांक निश्चित केले आहे. तृणधान्य पिके 1 लाख 54 हजार 100 हेक्टर, कडधान्य पिके 35 हजार 300 हेक्टर, गळीतान्य पिके 86 हजार 700 हेक्टर आणि अन्नधान्य पिके 1 लाख 89 हजार 400 हेक्टर. खरीप हंगाम 2020 करिता बियाणे मागणी 52 हजार 853 क्विंटल केली आहे. महाबीज 21 हजार 241 क्विंटल व खाजगी कंपनीकडून 31 हजार 711 क्विंटल मागणी केली आहे. जिल्ह्यात 6 जून अखेर महाबीज 3 हजार 833 क्विंटल व खाजगी कंपन्या मार्फत 19 हजार 747 क्विंटल, असे एकूण 23 हजार 580 क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. गतवर्षी महापुरामुळे सोयाबीन बियाणे खराब झाल्यामुळे शेतकऱ्याकडील उपलब्ध सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता प्रात्यक्षिके सोयाबीन पिक घेत असलेल्या गावामध्ये कृषी सहाय्यक व शेतकरी मित्र यांच्यामार्फत 1234 प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना उगवण क्षमतेनुसार बियाणाचे प्रमाण वापराबाबत मार्गदर्शन केले असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2020 करीता कृषि आयुक्तालयाकडून खताचे आवंटन असून युरिया 45 हजार 200 मे. टन, डीएपी 12 हजार 900 मे. टन, एमओपी 17 हजार 220 मे.टन, एसएसपी 26 हजार 510 मे. टन व एनपीके 26 हजार 660 मे.टन, असे एकूण 1 लाख 29 हजार 10 मे.टन आवंटन आहे. तसेच मार्च 2020 अखेर शिल्लक खत 20 हजार 228 मे. टन, असे एकूण 1 लाख 49 हजार 238 मे. टन आवंटन आहे. 6 जून अखेर युरिया 9650 मे. टन, डीएपी 9462 मे. टन, एमओपी 11812 मे. टन, एसएसपी 11365 मे. टन व एनपीके 32556 मे. टन, असे एकूण 74 हजार 845 मे. टन पुरवठा झाला असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
जिल्ह्यात गुणनियंत्रण कामासाठी 32 गुणनियंत्रण निरीक्षक व 11 भरारी पथके स्थापन केली असून आत्तापर्यंत 594 बियाणे वितरक, 722 खत वितरक व 653 कीटकनाशक वितरकांची तपासणी करून 195 बियाणे नमुने 178 खत नमुने व 18 कीटकनाशक नमुने विश्वेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी सादर केले आहेत. सन 2020-21 मध्ये गुणनियंत्रण कामाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या बियाणे, खते, कीटकनाशक वितरकांकडे कायद्यातील त्रुटी आढळून आल्या त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली असून बियाणे 13, खते 12 व कीटकनाशक 13, अशा एकूण 38 वितरकांवर कारवाई केली आहे. बियाणाचे 9 परवाने निलंबित केले आहेत व 4 वितरकांना सक्त ताकीद दिली आहे. खताचे व कीटकनाशकाचे प्रत्येकी 10 परवाने निलंबित केले आहेत. बियाणे 2, खत 1 व कीटकनाशके 2 परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. अशा प्रकारे गुणनियंत्रणाचे कामकाज प्रगती पथावर असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies