Type Here to Get Search Results !

बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कर्ज, हप्ते वसुली केल्यास कारवाई : मंत्री दत्तात्रय भरणे





बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कर्ज, हप्ते वसुली केल्यास कारवाई : मंत्री दत्तात्रय भरणे
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स तसेच  कोणत्याही संस्थेच्या मार्फत कोणत्याही प्रकारची कर्ज हप्ते वसुली केल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे यांनी माहिती दिली. कोरोना नसताना गत वर्षी मृत्यू संख्या अधिक होती.



कोरोनामुळे मृत्यूदर कमी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अनलॉक असतानाही सोलापूरकरांनी नियम पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये तरच कोरोनाचे संक्रमण कमी होईल असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  ग्रामीण पोलीसचे अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संजीव पाटील, वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

घर मालकांनी घर भाडेसाठी तगादा लावू नये
सध्या लॉकडाऊन मध्ये  घर मालकांनी घर भाड्या साठी तगादा लावू नये. कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी झाल्यास घर भाडे वसूल करावे. विनाकारण भाडेकरूंना त्रास देऊ नये, भाडे वसुलीसाठी तगादा लावू नये असेही भरणे यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies