Type Here to Get Search Results !

सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचे निधन


सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचे निधन 
मंगळवेढा/प्रतिनिधी : सोलापूरचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर युनूस शेख यांचं काल सकाळी निधन झालं. तीन दिवसापूर्वी त्रास होऊ लागल्याने युनूस शेख यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी काल पॉझिटिव्ह आली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला ते 80 वर्षांचे होते.
1969,1975 आणि 1985 साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 ला शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. शहरातील शरद पवार यांच्या राजकारणाची सूत्रे एकेकाळी त्यांनीच हाताळली होती. विशेषतः महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती एकवटला होता. १९९२ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा १९९७ साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अखेरपर्यंत त्यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies