Type Here to Get Search Results !

मंगळवेढ्यातील'त्या' व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित


मंगळवेढ्यातील'त्या' व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित
माणदेश एक्सप्रेस न्युज
मंगळवेढा/नारायण माने : मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे सोलापूर येथून एक व्यक्ती काही दिवसापूर्वी येवून गेला असून सदर व्यक्तीला त्रास होत असल्याने तो सोलापूर मध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.अद्याप त्याचा कोरोना चाचणी स्वॅब घेण्याबाबत डॉक्टरानी सांगितले नसल्याचे संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला असता समजले आहे. या घटनेबाबत आरोग्य विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे. सदर व्यक्तीचा उपचार सुरु असून स्वॅब घेतला गेल्यास  योग्यवेळी योग्य ती आवश्यक उपाययोजना तातडीने केली जाईल. तथापि याबाबत अनधिकृतपणे  चर्चा सुरु होतील असे वृत्त कोणीही पसरवू नये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies