Type Here to Get Search Results !

बचत गट, बँक, फायनान्सचे कर्ज वसुली करू नका ; राजेंद्र खरात यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी





बचत गट, बँक, फायनान्सचे कर्ज वसुली करू नका
राजेंद्र खरात यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : बचत गट, बँक, फायनान्स, मायक्रो फायनान्स, विविध महामंडळे  यांच्याकडील असणाऱ्या कर्जाची वसुली बंद करण्यात येवून मागासवर्गीय लोकांचे सर्व प्रकारची कर्जे माफ करण्याची मागणी आरपीआयचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यांमध्ये महिला बचत गटांना विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कमी व्याजाचे आमिष दाखवून आपला काळा पैसा अधिकृत करून घेतला आहे. सध्या कोरोना मुळे तालुक्यातील अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तर लॉकडाऊन असल्यामुळे महिलांचे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत.






त्यांच्या हाताला काम नाही. तसेच अनेक मागासवर्गीय लोकांनी महामंडळे व बँकांचे कर्ज घेतले आहे. परंतु त्यांच्या ही हाताला काम नसल्यामुळे जगायचे कसे हा मोठा? प्रश्न निर्माण झाला असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे? हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न आहे. तर  व्यवसाय करणाऱ्या लोकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे त्यांचीही परिस्थिती अतिशय वाईट अशी आहे.






तसेच आपण याबाबत बँका व मायक्रो फायनान्स व महामंडळे यांना वाहनांचे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घर कर्ज, वाहन कर्ज इत्यादींच्या ई एमआय वसुलीसाठी सक्ती करू नये असे आदेश दिले असताना सुद्धा अनेक  बँका व मायक्रोफायनान्स व फायनान्स अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी वारंवार महिलांना व इतर लोकांना त्रास देत आहेत त्यामुळे महिला वर्गाचे मानसिक संतुलन बिघडत असून त्यांच्यामध्ये आत्महत्या करण्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे.




त्यामुळे तालुक्यातील बुलढाणा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, माण देशी महिला बँक, म्हसवड, बजाज फायनान्स, ग्रामीण मायक्रो फायनान्स, भारत मायक्रो फायनान्स व बँका यांच्याकडून महिला बचत गटाने घेतलेले कर्ज यांची वसुली थांबून यांचे कर्ज माफ करावीत.
अन्यथा आरपीआयच्या वतीने एजंट व वसुली अधिकारी यांचा बंदोबस्त करून त्यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. 






आटपाडी तालुक्यामध्ये जर महिलांना व नागरिकांना कोणी बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स वाले त्रास देत असेल तर त्याच्या विरोधात ९४०५२६६९८१ या मोबाईल क्रमांकावरती लेखी तक्रार करावी.
राजेंद्र खरात
अध्यक्ष, आरपीआय आटपाडी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies