Type Here to Get Search Results !

भिकवडी खुर्द व कुंडलवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


भिकवडी खुर्द व कुंडलवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्हयातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दे व वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – 
कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील 1) ओढ्याच्या पूर्वेकडील भाग गट नं. 516 पर्यंत 2) कॅनॉलच्या उत्तरेकडील भाग हिंगणगादे रस्त्यापर्यंत 3) हिंगणगादे रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग कॅनॉलपर्यंत 4) विश्वनाथ गुंडा सावंत यांच्या घराच्या पश्चिमेकडील भाग, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे – 
1) भिकवडी खुर्द गावाच्या पूर्वेकडील पूल - अंतर 1 कि.मी. 2) भिकवडी खुर्द ते खेराडे विटा रस्ता पश्चिमेस - अंतर 1.5 कि.मी. 3) भिकवडी खुर्द ते कोतीज रस्ता उत्तरेकडे - अंतर 1.5 कि.मी. 4) भिकवडी खुर्द ते तुपेवाडी दक्षिणेकडील रस्ता - अंतर 1 कि.मी. 

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे –
 वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील 1) जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर ते आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर 2) आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर ते चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर 3) चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर ते आनंदा पांडुरंग पवार यांचे घर 4) आनंदा पांडुरंग पवार यांचे घर ते जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies