राज्यशासनाने “या” वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाहीसाठी केंद्राला विनंती करावी : पृथ्वीराज चव्हाण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

राज्यशासनाने “या” वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाहीसाठी केंद्राला विनंती करावी : पृथ्वीराज चव्हाण


राज्यशासनाने “या” वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाहीसाठी केंद्राला विनंती करावी : पृथ्वीराज चव्हाण 
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : राज्य शासनाने “या” वृत्तवाहिनीवर कायदेशीर कार्यवाही करावी कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारला विंनती करावी आणि या वाहिनीवर किमान १ महिन्याची बंदी घालण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी twitter द्वारे केली आहे.

एका राष्ट्रीय हिंदी वृत्त-वाहिनीने खोडसाळपणे टोमॅटो ला कोरोना शी जोडल्यामुळे राज्यातील टोमॅटो पिकाचे दर कोसळले आहेत व शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बेजबाबदार पत्रकारीतेवर कार्यवाही केलीच पाहीजे. आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहीजे. 

तसेच भविष्यात कोरोनाबद्दलचे कोणतेही रिपोर्टींग करताना ICMR किंवा केंद्राची परवानगी घेणे वृत्तवाहिन्यांना बंधनकारक करावे. अशी ही मागणी त्यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise