पै. चंद्रहार पाटील यास अखेर अटक ; खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना केली होती मारहाण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

पै. चंद्रहार पाटील यास अखेर अटक ; खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना केली होती मारहाण


पै. चंद्रहार पाटील यास अखेर अटक ; खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना केली होती मारहाण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : खानापूरचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना मारहाण करून फरारी असलेल्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे यास आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) च्या पथकाने सापळा रचून पडकले. 
दिनांक ३ मे रोजी चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना वाळूचा जादा दंड आकारला म्हणून विटा तहसील कार्यालयाच्या आवारात गाडीत बसत असताना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करून पळून गेले. त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती. ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा पथके शोध घेत होती. परंतु ते सापडले नाहीत.  आटपाडी तालुक्या.तील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती "एलसीबी' च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आज दुपारी चारच्या सुमारास हॉटेल अथर्वसमोर त्यास पकडण्यात आले. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी आणि पथकाने कामगिरी केली. 

No comments:

Post a Comment

Advertise