एका फोनवर “या” आमदारांनी अडकलेल्या मजुरांची केली घरी परतण्याची व्यवस्था - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

एका फोनवर “या” आमदारांनी अडकलेल्या मजुरांची केली घरी परतण्याची व्यवस्था


एका फोनवर “या” आमदारांनी अडकलेल्या मजुरांची केली घरी परतण्याची व्यवस्था   
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मांडवे/वार्ताहर : माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी यांनी मांडवे ता माळशिरस येथे आडकलेल्या मध्यप्रदेशातील 32 कामगारांसाठी तात्काळ जाण्याची व्यवस्था केली. मांडवे येथील ग्रामस्थ दत्ताभाऊ ढोबळे यांनी  शनिवार दि 16 रोजी  फोन करून अडकलेल्या मजुरांची माहिती दिली . तेव्हा लगेच माळशिरस चे  तहसीलदार पाटील यांना  आमदारांनी कॉन्फरन्स कॉल वरती घेऊन  सर्व हकिकत सांगितली व त्या मजुरांना तात्काळ मध्यप्रदेश ला सोडण्याचे आदेश दिले. त्याचदिवशी 
         संध्याकाळी चार वाजता  नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी ढोबळे यांना  फोन करून त्या सर्व कामगारांना रविवारी 17 रोजी  सकाळी  7 वाजता घेण्यासाठी दोन बस पाठवल्या जाणार आहेत असे सांगितले आणि दुपारी सोलापूर मधुन ट्रेनची पण व्यवस्था केली असल्याचे  सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काल सकाळी 7 वाजता दोन बस त्या 32 कामगारांना नेण्यासाठी आल्या आणि सोलापूरला देखील रवाना झाल्या. यावेळी नायब तहसीलदार तुषार देशमुख, मंडळ अधिकारी संदिप चव्हाण, अजित जाधव, तलाठी प्रविण उदगावे,  वहातुक नियंञक सुधाकर टिळेकर, कोतवाल विजय गायकवाड. दत्ताभाऊ ढोबळे आदी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

Advertise