Type Here to Get Search Results !

विधानपरिषदेला डावलल्याने भाजपच्या या माजी महिला आमदार नाराज


माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम 
आटपाडी : विधानसभा निवडणूकीत पुण्यातील कोथरूड विधानससभेच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी असताना त्यांचा पत्ता कट करून भाजपाचे तत्कालीन मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. कारण चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदार संघातून निवडून येता आले नसते. परंतु भाजपच्या या निर्णयामुळे कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. परंतु त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली नाही. त्यांची नाराजी दुर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा होती. पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यांनी आपल्या मनातील मनातील खदखद ट्विटरद्वारे ट्विट करत नाराजी दाखविली आहे. 
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या ट्विट मध्ये “ आज फिर दिल ने एक तमन्ना की…आज फिर दिल को  हमने समजाया….अशी शेरोशायरी करीत आपल्या नाराजी व्यक्त केली आहे. कुलकर्णी यांनी हे ट्विट करताना भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा आधार घेतला असून विशेष म्हणजे त्यामध्ये कमळाची एक पाकळी गळून पडल्याचे त्यांनी दाखविले असून माजी आमदार मेधा कुलकर्णी कोणता निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies