Type Here to Get Search Results !

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून या नेत्यांना संधी ; चर्चेतील नावांना पूर्णविराम



माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून धक्कादायकपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली असून दिग्गज नेत्यांना मागे टाकत जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश राठोड या युवा नेत्याला तर बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांना उमेदवारी दिली आहे.  
राजेश राठोड हे एनएसयूआयपासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी संघटनेत काम करत आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये राजकिशोर मोदी यांचे वर्चस्व असून त्यांनी जिल्ह्यात भाजप मजबूत असूनसुद्धा काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम केले असून त्यांचे सहकार क्षेत्रातही मोठे योगदान आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर राजेश राठोड व राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाला पसंती दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies